Thursday, April 2, 2009

एका वधुची परीक्षा ... ( First Interview of this Blog - Exam of Bride )

नमस्कार मित्रांनो ...

पहिली मुलाखत .. तीही मुलाखती देणारीची ...
नाव न सांगण्याची अटीवर तिने जे सांगितले ते तुमच्यासाठी इथे देत आहे ...

The First Interview of this blog is Vadhuchi Pareekha ( Experience of the To be Bride )..

-----------------------------------------------

एका वधुची परीक्षा ...........


शिरीष जांभोरकर: मग कसे कसे अनुभव आले मूल पाहाताना ?
एखादा इंट्रेस्टिंग अनुभव सांग ना ... :)
-------------------------------------------------------------------------------------
ती :


अरे एवढ्या वेगवेगळ्या टाइप चे मुले असतात ना..
काही चांगले असतात, पण काही मुले खूप आगाऊ असतात, काहीही विचारत बसतात..


मी एक चाकूर चा मुलगा बघितला होता तो एवढा लाजत होता ना.. मुलीच्या वर लाजत होता तो ..
एवढा लाजलु मुलगा मी कधीच पहिला नव्हता..


एक आइ बी एम मधला बघितला होता, तो त्याच्या वडिलांसोबत आला होता..
त्याचे वडील एक सांगत होते आणि हा वेगळाच सांगत होता..
त्याचे वडील म्हणे की याला कुकिंग करायला खूप आवडत.. काही करायाच असाल की घरी फोन करून विचारतो की कस करायचा पदार्थ तो..
तो लगेच म्हणे की नाही नाही मी घरी नाही फोन करत, कशाला फोन मधे पैसे वेस्ट करायचे , मी नेट वरुन शोधून काढतो..
गूगले वर सर्च केल की सगळ मिळते..

त्याला यातून काय सांगायाच होत काय माहीत..
कार्टून होता..





तो औरंगाबाद वाला पहिला होता, तो जरा जास्तच आगाऊ होता..
½ तास खूप पकवल..
त्यानी विचारळ की, घरात तुज़ा सगळ्यात जवळच कोण आहे आई आहे की वडील आहेत..
आता हा काय प्रश्न झाला??.
म्हणे की मला गिटार वाजवायला आवडत.. सिंगिंग पण येते.. कुकिंग येते..
मग त्याचा जॉब च सांगत बसला.. खूप बोर झाल..





एक , त्याच्या आई सोबत आला होता , तो पण खूप आगाऊ होता..
त्याची आई पण तशीच..
म्हणे की आम्हाला चांगली, मन मिळावू, मुलगी हवी आहे..
त्या मुलाच्या बहिणी अब्रॉड सेट्ल आहेत..

त्याची आई म्हणे की मुलीने, जर तिच्या मुली एकडे आल्या तर नाक मुरडल नाही पाहिजे..

त्यांचा सगळ केल पाहिजे..

म्हणे माझ्या मैत्रिणीची सून काही काम करत नाही घरात.. दररोज नवर्‍याला बाहेरून डबा आणायला लावते..

आता हे सांगायची काही गरज??.

वर आणखी तो मुलगा म्हणतो की त्याला मॉडर्न मुलगी पाहिजे म्हणे..





काय सागु आता तुला.. प्रत्येक मुलगा काही तरी नवीनच असतो..

दर वेळेस नवीन एक्सपीरियेन्स असतो..
 
html hit counter
free website url submission